दळाचे लाडू
साहित्य - एक वाटी रवा, एक वाटी मैदा, किसमिस, दीड वाटी दळलेली साखर, एक वाटी साजूक तूप
कृती - रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा. त्याच तुपावर मैदा भाजून घ्यावा. नंतर दोन्ही मिश्रण एकत्र करावं. गार झाल्यावर त्यात वेलची पावडर, पिठीसाखर घालून चांगलं मळून घ्यावं. नंतर त्यात बेदाणे, बदाम, काजू घालून लाडू वळून घ्यावेत.
खांडवीच्या वड्या
साहित्य - एक वाटी तांदूळ रवा, दोन वाट्या पाणी, दीड वाटी गूळ, मीठ, वेलची, तूप.
कृती - तांदूळ रवा तुपावर चांगला तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात गूळ घालावा. चवीपुरतं मीठ घाला. नंतर पाण्याला उकळी आणा. त्यात भाजलेला रवा घाला आणि शिजवा. नंतर वेलची पावडर घाला. घट्ट झाल्यावर ताटाला तुपाचा हात लावून शिजलेला रवा ओता. त्यावर ओलं खोबरं पसरवून थापा व त्याच्या वड्या कापा.
सफरचंदाचे पराठे
साहित्य - एक मोठं सफरचंद, पिठीसाखर आवडीनुसार, १ चमचा काजू-बदाम पावडर, लोणी, अर्धा चमचा वेलची पावडर, गव्हाची कणिक, भाजण्यासाठी तेल, तूप, मीठ, साय, तांदूळ पीठी
कृती - प्रथम सफरचंदाची सालं काढून ते किसून घ्यावं. त्यात वेलची पावडर, काजू पावडर घालावी. नंतर आवडीनुसार पिठीसाखर घालून व्यवस्थित सर्व मिश्रण करून त्यात मावेल एव्हढी कणिक घालून घट्ट भिजवावे. तव्यावर तूप सोडावं. प्लास्टिकच्या कागदावर थापून किंवा तांदळाच्या पिठावर लाटून खमंग भाजावं. लोणी किंवा सायीबरोबर खावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट