साहित्य - एक वाटी बारीक रवा, २-३ चमचे मैदा, थोडं तेल, चवीपुरतं मीठ, मीठ, खोवलेला ओला नारळ, १०० ग्रॅम खवा, दूध, तूप, साखर, काजू, किसमिस, बदाम, चारोळी, वेलचीपूड.
कृती - रवा आणि मैदा चाळून एकत्र करून एका ताटात ठेवा. त्यात थोडं मीठ आणि थोडं गरम तेलाचं मोहन घालून घ्या. दुधाने हे पीठ घट्ट भिजवून ५- ६ तास तसेच ठेवा.
मोदकाचं सारण करण्यासाठी कढईत दूध आणि खोवलेला नारळ घालून घट्ट होईपर्यंत गॅसवर गरम करा. त्यात चवीनुसार साखर नंतर खवा घालून एकत्र करा. हे सारण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड, काजू- बदामाचे तुकडे, किसमिस व चारोळी घालून चांगलं मिसळा. आता भिजवलेल्या पीठाचे लहान आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटा. त्यात सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या. गरम तुपात हे मोदक गुलाबी रंग येईपर्यंत तळा. हे तळलेले मोदक छान खुसखुशीत लागतात. शिवाय ५-६दिवसांत टिकतातही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट