साहित्य - एक वाटी सफरचंदाच्या फोडी, एक वाटी पेरच्या फोडी, एक वाटी डाळींबाचे दाणे, अर्धी वाटी वेलची केळ्याच्या फोडी, अर्धी वाटी पपईच्या फोडी, चवीपुरते मीठ, जिरे, तूप, मिरच्या खोबरं, मोदकाच्या पारीसाठी तांदळाचं पीठ आणि तूप.
कृती - आधी मोदकाच्या पारीसाठी नेहमीप्रमाणे पाणी उकळून त्यात तांदळाचं पीठ आणि तूप घालून घ्यावं. हे मिश्रण नीट मळून घ्यावं. तूप घातल्याने पारी छान होते.
तूप तापवून त्यात जिरं आणि हिरवी मिरची टाकावी. त्यात सर्व फळांच्या फोडी घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावं. या सारणात चवीप्रमाणे मीठ घालावं. तुम्हाला आवडत असल्यास साखरही घालता येईल. सारण मोदकाच्या पारीत भरून नेहमीप्रमाणे मोदक करावे. मोदक पात्रात १५ मिनीटं वाफवावेत. एका वेगळ्या प्रकारचे खट्टेमीठे पंचरत्न मोदक तयार होतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट