वर्षातल्या सर्वात उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या या दिवाळी सणाला काही गोड नाही, असं होऊच शकत नाही. दरवर्षी फराळाचे गोडधोड पदार्थ आणि मिठाईची तर रेलचेल असतेच. पण यंदा पारंपरिक पदार्थांसोबतच पाश्चिमात्य गोडधोडानेही आपल्या दिवाळीत जागा पटकवलीय.
लाडू-करंजीसोबत चॉकलेट तर आपण देत होतोच. पण यंदा क्रेझ आहे, कपकेकची. आता दिवाळी स्पेशल कुकीज आणि कपकेकची जोरदार क्रेझ दिसतेय. अनेक दुकानांतून शुगर क्रीम चॉकलेट कपकेक मिळतायत. या कपकेकवर कंदील, रांगोळी, कलश, फटाके, पणती, मेहंदी डिझाइन, झेंडूची फुले, दिवाळीचा संदेश अशा विविध गोष्टींची चिन्हं नक्षी म्हणून दिसू लागली आहेत. कुकीजमध्येही असेच भन्नाट आकार आणि चित्र आली आहेत.
हे कपकेक आणि कुकीज त्यांच्या विशिष्ट रंगसंगतीमुळे आणि चित्रांमुळे उठून दिसतात. शुगर क्रीमच्या रेखीव डिझाइन्स हे त्यांचं विशेष आकर्षण दिसतंय. सोबतच चॉकलेट दिवा, चॉकलेट ट्रफल, चॉकलेट पॉप सारखे हटके पदार्थही यंदा लोकप्रियता मिळवत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट