साहित्य : २ कप बारीक रवा, पाऊण कप तूप (साजूक तूप + वनस्पती तूप) दीड कप साखर, २-३ थेंब रोझ इसेन्स, सजावटीसाठी केशरकाड्या आणि सुकामेवा. सारणासाठी : ३/४ कप खवा, २ टे स्पून गुलकंद, काजू-बदामांची जाडसर पूड आणि थोडे बेदाणे.
कृती : कढईमध्ये तूप गरम करावं. त्यात रवा घालून तो मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. खवा थोडासा परतून घेऊन त्यात गुलकंद, काजू-बदामाची पूड मिसळावी. एका पातेल्यात साखर घेऊन ती पूर्ण भिजेल, इतकं पाणी घालून एकतारी पाक करावा. पाक झाला, की त्यात रोझ इसेन्स, भाजलेला रवा आणि बेदाणे घालून मिश्रण थंड करायला ठेवावं. दोन-तीन तासांनी लाडू वळायला येतील. लाडू वळताना त्यामध्ये गुलकंदाचं सारण भरावं. असे हे गुलकंद लाडू खायला तयार होतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट