संगीता गुरव
मिश्र डाळींचे डोसे तयार करण्यासाठी साहित्य आणि पाककृती
साहित्य - प्रत्येकी एक वाटी मूगडाळ, चणाडाळ, उडिद डाळ, तांदूळ मीठ चवीनुसार.
कृती - वरील सर्व डाळी व तांदूळ रात्री भिजत घालाव्यात. सकाळी मिक्सरमधून सर्व एकत्र वाटून घ्याव्यात. सकाळी सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. यात चवीनुसार मीठ घालावं. आता नॉनस्टीक पॅनवर थोडंसं तेल घालून मस्त डोसे करावेत. आवडेल त्याप्रमाणे खोब-याच्या चटणीबरोबर सर्व्ह करणे. ही अतिशय पौष्टीक आणि झटपट पाककृती आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट