Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

घरगुती पिझ्झा

$
0
0

रोशनी इंगळे

घरगुती पिझ्झा तयार करण्यासाठी साहित्य आणि पाककृती

साहित्य - २-३उकडलेले बटाटे, १ किसलेलं गाजर, १ किसलेला बीट, स्वीटकॉर्न, फरसबी, स्प्रेड चीज, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, ऑरीगानो, जलेपेनो, काळी मिरी, भिजवलेली कणीक

कृती - प्रथम उकडलेले बटाटे कुस्करन त्यात काळी मिरी आण‌ि मीठ घालावं. मग कणकेत हे बटाट्याचं मिश्रण भरून त्याचा पराठा बनवून घ्यावा. हा पराठा एका बाजूने कडक करून त्यावर स्प्रेड चीज, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस लावून घ्यावा. आता यावर किसलेलं गाजर, बीट याचा एक थर लावावा. मग जलेपेनो गोल कापून त्यावर ओरेगानो घालून घ्या. यावर किसलेलं चीज पसरवा.

हे सगळं मिश्रण गॅसवर ठेवा. झाकण घालून ते शिजवून घ्या. आता तुमचा घरगुती पिझ्झा तयार झाला आहे. एका ताटलीत तो काढून सुरीने त्याचे पिझ्झ्याप्रमाणेच चार भाग करून घ्या. गरमागरम खायला द्या.

हा पिझ्झा मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यात मैदा नाही. शिवाय भरपूर भाज्या असल्याने तो पौष्टिकही असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>