तळलेले वाटण - एक कांदा, मूठभर खोबरं, चमचाभर धणे आणि तेवढीच बडीशेप
भरड - चमचाभर खसखस, वाटीभर खोबरं, चिमूटभर दालचिनी पूड, मीठ चवीप्रमाणे, तेल.
कृती - कोबी किंचित तेलावर तरतून घ्यावा. तळलेल्या वाटणाचं साहित्य खरपूस भाजून बारीक वाटावं आणि एका भांड्यात ओतावे. त्यात बेसन, हळद, तिखट, मीठ, जिरेपूड आणि कोबी घालून एकजीव करावं. आवश्यक तेवढे पाणी घालून भजीच्या पीठाप्रमाणे भिजवावं. एका जाड बुडाच्या कढईत शिजवून घ्यावं. परातीच्या मागल्या बाजूला एक ओलसर सुती कापड पसरवून त्यावर वरील मिश्रण पसरवावं. खसखस, खोबरं आणि जिरेपूड भाजून त्याची भरड वाटावी. ही भरड त्या मिश्रणावर पेरावी. अलगद हातांनी कपडा सोडवून त्रिकोणी वडी बनवावी. शॅलो फ्राय करून सर्व्ह करावी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट