- प्राची प्रभू, वाशी साहित्य - एक वाटी उकडलेले अमेरिकन कॉर्न, अर्धी वाटी पातीचा कांदा, दोन-तीन उकडलेले बटाटे, चार चमचे मैदा, चार चमचे बटर, १५० मिली दूध, ब्रेड क्रम्स, चीज, आवश्यकतेनुसार मीठ, मिरी पूड, सजावटीसाठी कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या कृती -व्हाईट सॉससाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात मैदा, मीठ काळी मिरी आणि दूध टाका. हे सतत हलवा. थोडासा घट्ट झाला की गॅस बंद करा. एका भांड्यात उकडलेले मक्याचे दाणे घ्या. त्यात उकडलेला बटाटा, पातीचा कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून घ्या. चवीपुरतं मीठ घाला. थोडे ब्रेड क्रम्स घालून हे मिश्रण एकजीव करा. चीजचे छोटे छोटे तुकडे करा. कॉर्नच्या या मिश्रणाच्या आत चीजचा एक तुकडा ठेवा. गोळा बंद करा. त्याला बॉलसारखा आकार द्या. आता तो व्हाइट सॉसमध्ये बुडवा, ब्रेड क्रम्समध्ये घोळवा आणि तेलात छान सोनेरी रंगावर तळून घ्या. सॉससोबत त्याचा आस्वाद घ्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट