Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

बेकिंग सोड्याचे असेही उपयोग

$
0
0

मैत्रिणींनो, बेकिंग सोडा वापरून तुम्ही उत्तमोत्तम पदार्थ तयार करत असालच. पण त्याव्यतिरीक्तही त्याचा स्वयंपाकघरात खूप वापर करता येतो. तो कसा याबद्दल... चिमूटभर बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून घ्या. आता या मिश्रणाने ताज्या भाज्या आणि फळं धुवा. त्यामुळे त्यावरची घाण आणि कीटकनाशकं निघून जातील. बेकिंग सोड्याचा उपयोग तुम्ही भांडी साफ करण्यासाठी करू शकता. ज्या भांड्यांवर कठीण डाग पडले असतील. त्यावर थोडासा बेकिंग सोडा शिंपडा. ते डाग थोड्याशा पाण्याने घासून घ्या आणि शेवटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. फ्रीजमध्ये आपण जे येईल ते कोंबतो. त्यामुळे मग फ्रीजला काहीवेळा वास येऊ शकतो. एका उघड्या भांड्यात बेकिंग सोडा ठेवून द्या. फ्रीजला असलेला दुर्गंध निघून जातो. एक चमचा बेकिंग सोडा थोड्या गरम पाण्यात मिसळून घ्या. या मिश्रणाचा उपयोग करून स्वयंपाकघरातील धातूच्या वस्तूंवरचे डाग घालवता येतात. अनेकदा एखादा डाग पडतो. तो वेळीच पुसला नाही की सुकतो. मग कडक होऊन जातो. तो घालवणं कठीण होऊन बसतं. यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समप्रमाणात एकत्र करा आणि हे मिश्रण त्या कडक डागांवर लावा. डाग नक्की जातील. लहान मुलांची खेळणी धुणं हा एक मोठा व्याप असतो. रबर आणि प्लास्टिकची खेळणी तुम्ही बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणाने धुऊ शकता. पण ती नीट वाळवून मगच परत खेळायला द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>