साहित्य: १ वाटी मैदा, पाव वाटी बटर, मीठ, दुध, कोबी, सिमला मिरची, गाजर, कांद्याची पात, मका, आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, चीज, टोमॅटो सॉस, टार्ट बनविण्याकरिता साचा. कृती: मैदा, बटर, मीठ, चीज एकत्र करून दुधाने मळून घ्यावं. नंतर मैद्याचे छोटे गोळे करून लाटून साच्यामध्ये लावून ते बेक करून घ्यावे. एका कढईमध्ये बटर घालून त्यावर आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची परतून त्यावर सर्व चिरलेल्या भाज्या व मीठ घालून एक वाफ काढून घ्या. मग त्यात सॉस घालून मिक्स करून ठेवा. बेक केलेल्या साच्यामध्ये वरील सारण भरून वर भरपूर चीज घालून ५ मिनिटांसाठी पुन्हा बेक करावं. वर सॉस घालून गरमागरम खायला द्यावं. आरती शिरगावकर, कळवा, ठाणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट