शेफ अजेय गोगटे साहित्यः डार्क चॉकलेट १५० ग्रॅम, डेअरी क्रीम १०० ग्रॅम, दाण्याचं जाड कूट ५० ग्रॅम, तीळ ५० ग्रॅम, किसलेलं खोबरं ५० ग्रॅम कृतीः १. प्रथम दाण्याचं कूट, तीळ आणि किसलेलं खोबरं भाजून थंड करून घ्या. २. डेअरी क्रीम मध्यम आचेवर ठेवून उकळी येऊ द्या. नंतर गॅसवरून भांडे उतरवून त्यात डार्क चॉकलेट विरघळेपर्यंत ढवळा. ३. तयार झालेल्या मिश्रणात भाजून थंड केलेलं दाण्याचं कूट आणि किसलेलं खोबरं एकत्र करा. ४. मिश्रण ५ ते १० मिनिटे (घट्ट होईपर्यंत) फ्रिजमध्ये ठेवा. ५. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याचे तीळगुळाच्या आकाराचे बॉल्स करून ते भाजलेल्या तिळात घोळवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट