खसखशी बोरं कांचन जोशी, भाईंदर साहित्य: तांदूळ, गूळ, तूप (शुद्ध), तीळ, खसखस, मीठ, खोबरं (भाजून घेतलेले ओले खोबरे) कृती: प्रथम रात्रभर तांदूळ भिजवावेत. सकाळी उपसून ते वाळवून घ्यावे. कोरडे झालेले तांदूळ भाजून घ्यावे. थंड झाल्यावर ते मिक्सरमधून काढून त्या पीठात तीळ, खसखस, भाजून घेतलेलं ओल खोबरं, गूळ, किंचित मीठ, तुपाचे मोहन घालून दोन-तीन तास मुरत ठेवावं. नंतर त्याचे छोटे-छोटे गोळे करून तीळ आणि खसखशीमध्ये घोळवून मंद आचेवर खरपूस तळून घ्यावे. अशा प्रकारे खसखशी बोरं तय्यार!!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट