Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

फलाफल चमचमीत पॅटी

$
0
0


विविध भाज्यांची पॅटी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि चवीच्या ग्रेव्हीसोबत सर्व्ह करतात त्याला फलाफल असं म्हणतात. मूळ इजिप्तचा असलेला हा पदार्थ आता आपल्याकडेही बऱ्यापैकी मिळायला लागला आहे. अशा चवदार आणि रसरशीत फलाफल मिळणाऱ्या अस्सल पाच जॉइण्टविषयी...

देसी झणका
पाश्चिमात्य देशातील पदार्थ देसी स्टाइलमध्ये आपल्याकडे मिळू लागले आहेत. मूळ पदार्थ तसाच ठेवून आपल्याकडील मसाले आणि जिन्नसांचा वापर करुन एखाद्या पाश्चिमात्य देशाला देशी स्टाइलनं बनवलं जातं. फलाफलमध्येही हा फॉर्म्युला वापरला जात असून अंधेरी येथील ‘द बर्गर ब्रासरी’ येथे तो मिळतो.

झणझणीत तडका
तिखट आणि मसालेदार खाण्याचे चाहते अनेक आहेत. यासाठी काही हॉटेल्समध्ये नेहमीपेक्षा जास्त तिखट आणि मसालेदार भाज्या मिळतात. हाच झणझणीत फंडा फलाफलमध्येही वापरण्यात आला आहे. त्यामुळे तिखटप्रेमींनो वाशी येथील ‘फलाफल्स’ येथे मिळणारं फायरक्रॅकर फलाफल हे तुमच्यासाठीच आहे.

हमस स्टाइल
विविध ग्रेव्हींसह फलाफल मिळत असलं तरीही काही ठिकाणी ते हमससोबतही सर्व्ह केलं जातं. अशा ठिकाणांपैकी एक म्हणजे ठाणे येथील ‘ग्रीक गायरोज’ कॅफे. चवदार हमससह फलाफल खायचं असल्यास या कॅफेशिवाय दुसरा उत्तम पर्याय असूच शकत नाही.

अस्सल चस्का
लसूण आणि ताहिनीची चव असलेलं फलाफल खायचं असल्यास जुहू येथील ‘याल्ला याल्ला’ कॅफेशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. या फलाफलचा अस्सल चस्का दीर्घकाळ जीभेवर रेंगाळल्याशिवाय राहत नाही. असा हा अनोखा हमस खाण्यासाठी या कॅफेमध्ये तरुण मंडळी गर्दी करतात.

टिक्की फंडा
विविध भाज्या किंवा इतर जिन्नस स्टफ करुन बनवलेली टिक्की चवीनं खाणारी मंडळी खूप आहेत. अशा टिक्कीप्रेमींसाठी खास पिटा पॉकेट फलाफल मिळतं. ठाणे येथील ‘फॅमेली ट्री’ या हॉटेलमध्ये हा टिक्कीदार पर्याय आहे. येथे पिटा ब्रेडमध्ये रॅप केलेलं टिक्की फलाफल हमससोबत सर्व्ह केलं जातं.

संकलन- शब्दुली कुलकर्णी
Shabduli.Kulkarni@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles