साहित्य - १ वाटी राजगिरा पीठ, एक मोठं उकडलेलं रताळं (साल काढून घ्या), १ चमचा जिरं, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पाच चमचे घरगुती किंवा विकतचं साजूक तूप, चवीनुसार मीठ.
कृती - एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिरा पीठ, रताळं, जिरं, शेगदाण्याचा कूट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हे सगळे घटक एकत्र घेऊन चांगले मिक्स करा. नीट मिसळल्यावर त्यात थोडं साजूक तूप घालून मस्त घट्ट मळून घ्या आणि सुमारे दहा मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवा. त्यानंतर या मिश्रणाचे मध्यम आकाराचे समान गोळे करा आणि हलक्या हाताने पोळपाटावर गोल पराठा लाटून घ्या, किंवा हलक्या हाताने थापा.
लाटलेले हे पराठे गरमागरम तव्यावर टाका. पराठे भाजताना त्याच्या दोन्ही बाजूंना साजूक तूप लावा आणि चांगले खरपूस भाजा. उपवासाचे हे पराठे चवीला अगदी उत्तम लागतात.
- तुलसी लवांकुश
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट