आवरणाचं साहित्य - एक कप मैदा आणि कणीक यांचं मिश्रण, दोन टेबलस्पून रवा, अर्धा टीस्पून मीठ, तीन टेबलस्पून तेल, अर्धा कप पाणी.
सारणाचं साहित्य - चार मध्यम आकाराचे उकडून कुस्करुन घेतलेले, अर्धा कप मटार उकडून घेतलेले, एक टीस्पून जिरं, एक टेबल स्पून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून आमचूर पावडर, दोन टीस्पून मीठ, दोन टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
इतर साहित्य - तीन टेबलस्पून मैदा आणि कणीक यांचं मिश्रण, एक कप पाणी, तळण्यासाठी तेल.
आवरण बनवण्यासाठी कृती - पीठ, रवा, मीठ आणि तेल एकत्र करुन घ्या. मऊ गोळा बनवण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं घाला. मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. पिठाचा गोळा दमट सुती कापडानं झाकून ठेवा. ते पीठ १५ मिनिटं एका बाजूला ठेवून द्या.
सारण बनवण्यासाठी साहित्य - बटाटे, मटार, जिरे, धणेपूड, हिरव्या मिरच्या, आमचूर पावडर, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र करुन घ्या. मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्या. या मिश्रणाचे दोन भाग करुन ते एका बाजूला ठेवून द्या.
पिनव्हील बनवण्याची कृती - पाव कप पाण्यात तीन टेबलस्पून मैदा आणि कणीक घालून ते व्यवस्थित ढवळा आणि एका बाजूला ठेवून द्या. आता आवरणासाठी बनवलेला पिठाचा गोळा पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. आता याचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या. एका लहान गोळ्याचे दोन भाग करा. त्या दोन्ही लहानशा गोळ्याच्या पोळ्या बनवून घ्या. एका पोळीवर सारण पसरवा आणि त्यावर दुसरी पोळी ठेवा. आता त्याचा रोल करा. थोडासा पाण्याचा हात लावून रोलच्या कडा बंद करा. सुरीने त्या रोलचे तुकडे करा. छोटे-छोटे तुकडे मध्यभागी दाबा. एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करुन घ्या. लहान-लहान तुकडे आधी बनवून ठेवलेल्या, पाणी आणि पिठाच्या मिश्रणात घोळवून मग तळून घ्या. पिनव्हीलला सोनेरी रंग येईपर्यंत तळा. असे हे कुरकुरीत आणि चविष्ट पिनव्हील्स सॉसबरोबर सर्व्ह करा.
टिप्स - कच्च्या स्वरुपातील पिनव्हील्स फ्रीजमध्ये पाच ते सहा आठवडे राहू शकतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट